✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-आरती जगताप (जीवने) या एकात्मिक बाल विकास कार्यालय चंद्रपूर येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.नुकत्याच त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.
आज दिनांक २८ रोजी सकाळी अंदाजे ९.३० च्या सुमारास त्या चंद्रपूर वरून कुटुंबासमवेत अकोल्याकडे निघाल्या होत्या.
मात्र नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग त्यांच्यासाठी अखेरची घटका ठरला.चालकाचे नियंत्रण गेल्याने त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला धडक दिली. धडक इतकी भयानक होती की कारच्या आतील पाचही जणांना जागीच मृत्यू झाला.
💥हा दुर्दैवी अपघात आज दुपारी १२ वाजता धामणगाव रेल्वे नजीक घडला
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर धामणगावजवळील चॅनल क्रमांक १०६ नजीक हा अपघात घडला. मृतांमध्ये आरती जगताप (जीवने) बाल विकास प्रकल्प अधिकारी (४०), भास्कर महादेव जीवने (५७), महादेव जीवने (४२), त्रिशा जीवने (१२) व लता महादेव जीवने (४३, सर्व रा. डीएड कॉलेजजवळ, बाबूपेठ, चंद्रपूर यांचा समावेश आहे.
💢घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली
पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्तांना धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले. चालकाला डुलकी आल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे समजते.मृतांमध्ये आरती जगताप (जीवने) यांच्या सह त्यांचे पती,मुलगी,सासू, सासरे असल्याचे कळते.













