✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-नामे तनुजा वकील भडके,वय १९ वर्ष राह.रमाबाई नगर बल्लारशाह रोड चंद्रपूर हिचे
विरे योगेश उपरे वय २४ वर्ष, राह. अष्टभुजा वार्ड चंद्रपूर याच्या बरोबर प्रेम सबंध होते. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये मतभेद आणि तणाव निर्माण झाला होता. थोड्या थोड्या गोष्टी ला धरून त्यांचे भांडणे होऊ लागले होती.
तनुजा ने प्रेमाच्या निराशेला कंटाळून वीर ला चांदा फोर्ट च्या रेल्वे पटरीवर आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे कळविले.
संबंधित माहिती रामनगर पोलीस स्टेशनला सकाळी ९ च्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या
पोलीस हवालदार द्यानेश्वर तळवेलकर यांना मिळाली.घटनेची गंभीरता ओरखून तरळवेलकर यांनी पो. अ. शशीकांत जिवतोडे यांनी माहिती दिली.
तात्काळ झानेश्वर तळवेकर आणि पो.अ.शशीकांत जिवतोडे यानी घटना स्थळा कडे चांदा रेल्वे स्थानकाकडे प्रस्थान केले.
घटनास्थळी पोहोचल्या नंतर साधारणता १९ – २० वर्षाच्या मुलीची हालचाल नैराश्यजनक आणि विमस्मकारक दिसून आल्यामुळे तिला पोलिस पथकांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली.
चौकशी दरम्यान तिने सांगितले की,तिचे नाव तनुजा वकील भडके असून तिचे वय १९ वर्षे आहे. ती रमाबाई नगर बलारपूर रोड चंद्रपूर येथे राहते.प्रेमाच्या नैराश्यातून आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलले होते असे तिने सांगितले.
पोलिसांनी तिच्या आई वडिलांची माहिती काढून त्यांच्या कडे तनुजाला सुपूर्त केले.
🚨पोलिस हवालदार द्यानेश्वर तळवेलकर, प्रतिभा डाहुले अंमलदार,पोलिस अधिकारी शशिकांत जीवतोडे,पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा काळे यांच्या पथकाने एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचल्यामुळे रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
👉पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रभावती एकरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
✳️रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तप्तरतेमुळे आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मुलीचे वाचले प्राण ही मात्र अभिनंदनाची बाब आहे.
सर्व स्तरातून रामनगर पोलीस स्टेशनचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.











