प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
भद्रावती :बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. खापरी वॉर्ड क्र. ३ येथील एका तरुणाच्या घरातून ३ तलवारी आणि १ खंजीर असा एकूण १३,००० रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव गोविंदा मारोती बावणे (वय २६, रा. खापरी वॉर्ड क्र. ३, भद्रावती) असे आहे.
गुन्हे शोध पथकाला ११ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, गोविंदा बावणे हा आपल्या राहत्या घरी तलवारीसारखी शस्त्रे बेकायदेशीररीत्या बाळगून आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली. झडतीत ३ तलवारी आणि १ खंजीर आढळून आला.

पोलीस अंमलदार खुशाल कावळे यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. ९८८/२०२६, शस्त्र कायदा कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त शस्त्रांचा तपशील
पहिली तलवार – ५,००० रु, दुसरी तलवार – ४,००० रु., तिसरी तलवार – ३,००० रु., खंजीर – १,००० रु.
एकूण : १३,००० रु.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, SDPO संतोष बाकल व ठाणेदार सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. PSI संतोष केदार यांच्यासह गुन्हे शोध पथकाने कारवाई केली.
पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.














