✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
नांदाफाटा:-श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणादिवस उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचनामध्ये रुची निर्माण व्हावी, माहितीचा साठा होऊन वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे,हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय होते

अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मुसळे सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासामध्ये वाचनाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.व वाचणामुळे व्यक्तिमत्व समृद्ध होते. असा संदेश दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ. शेंडे व शिक्षक रामकृष्ण रोगे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी वाचनाची नित्य सवय लावून ज्ञान, विचारशक्तीचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचाही विद्यार्थ्यांना परिचय करून दिला
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक प्रमोद वाघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन बोढाले यांनी केले.
या कार्यक्रमात शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वाचन संस्कृती जोपासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी रोज एक पान वाचण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.














