संघटनात्मक कामकाजाचा घेतला आढावा; लोकशाही, संविधानाचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याचे आवाहन.
✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :-लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री तथा राजपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाला बच्चन यांच्या अध्यक्षतेखाली, काँग्रेसचे

,विधीमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हाँटेल सिद्धार्थ प्रिमियर, चंद्रपूर येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, संघटनात्मक बांधणी आणि आगामी पक्षीय कार्यक्रमांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. तसेच १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या वोट बचाव देश बचाव महारॅलीत जास्तीत जास्त संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस द्वारा आयोजित बैठकीत पर्यवेक्षक आमदार बाला बच्चन यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. AICC कडून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आ. बच्चन यांच्या दौऱ्याला संघटनात्मकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करणे, लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे पुढाकार घेण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यानंतर आ. बाला बच्चन, आ. विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन वोट बचाव देश बचाव अभियान, मत चोरी, तसेच दिल्ली येथील महारॅली संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मान्यवरांनी मोत चोरी ही गंभीर बाब असून भारतीय लोकशाही, संविधान आणि नागरिकांचे अधिकार वाचविण्यासाठी विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी आणि काँग्रेस तथा इंडिया आघाडी संघर्ष करीत आहेत. १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे महारॅली काढण्यात येणार आहे. यात काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
यावेळी अनुसुचित जाती विभाग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, शहराध्यक्ष युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष सफाक शेख, प्रदेश सचिव रोशनलाल बिट्टु, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल, शहर महिला जिल्हा अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, के. के. सिंग, प्रवीण पडवेकर, प्रा. सुर्यकांत खनके, प्रा. राम राऊत, प्रमोद बोरीकर, दिपक वाढई, श्यामकांत थेरे, सपना मोरे, पवन भगत, सुनीता गोवर्धन, नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा अल्काताई वाढई, माजी महापौर संगीता अमृतकर, महानगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले, नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजु रेड्डी, दिनेश चोखारे, प्रवीण काकडे, भाष्कर माकोडे, विजय घरत, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, उत्तमराव पेचे, रंजन लांडे, गोविंदा उपरे, अशोक रेचनकर, नितीन गोहणे, वासुदेव पाल, रमाकांत लोधे, राजेंद्र चिकटे, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, काँग्रेसचे प्रदेश, जिल्हा व शहर स्तरावरील काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाडी संघटनांचे पदाधिकारी, विभाग व सेलचे पदाधिकारी तसेच काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा राव पोलशेट्टी यांनी केले. संचालन जिल्हा शहर अध्यक्ष मनिष तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन शहर महिला जिल्हा अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी मानले.















