कोडशी बूज येथे जल्लोष -थेट सरपंच असताना निवडणूक होण्याची जिल्ह्यातील दुसरी वेळ
✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-कोडशी बूज येथील सरपंच उमेश कोल्हे यांच्यावर नऊ विरुद्ध एक नी अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता.मात्र ही सरपंच पदाची निवड थेट जनतेतून झाली असल्याने मंगळवार दिनांक 6 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

यात एकूण १००८ मतदारांनी नोंदणी केली होती. यामध्ये प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत १००१ मतदारांनी भाग घेतला. यावर निकाल येत सरपंच होय कायम बाजूने ५५५ , नाही या विरुद्ध बाजूने ४२१ मते पडली तर २५ मते अवध ठरली.
कोडशी बूज ही कोरपना तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण ग्रामपंचायत राहिली आहे. नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये मागील सरपंच पदाची निवड थेट जनतेतून झाली होती. त्यामुळे अविश्वास ठराव नंतर या झालेल्या निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायत अंतर्गत कोडशी बूज, गांधीनगर या दोन गावाचा समावेश आहे.
मतदान व मतदान मोजणी प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी बालाजी कदम,तहसीलदार पल्लवी आखरे, गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, नायब तहसीलदार करिष्मा वासेकर , पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले आदी सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.














