✍️दत्तात्रेय बोबडे
संपादक यवतमाळ
राळेगाव:-केंद्र शासनाने यंदाही एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत संघटनेने १७ जून रोजी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड करण्यात आली.
शेतकऱ्याना २००८ पासून तणनाशक-प्रतिरोधक तंत्रज्ञान असलेले HTBT कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याने शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत असल्याचा दावा तंत्रज्ञान मेळाव्यात करण्यात आला केला.
या निषेधाचा पहिला टप्पा म्हणून शेतकरी संघटनेने १० जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान गुजरातमधून प्रतिबंधित HTBT बियाणे महाराष्ट्रात आणलेआणी शेतकरी संघटनेकडून
आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून १७ जून रोजी दुपारी १२ वाजता खडकी (ता. राळेगाव) येथील राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात शाषणाची बंदी झुगारून ‘प्रतिबंधित बियाण्याची लागवड’ करण्यात आली, तुप टाकळी ह्या गांवी 5हजार हेक्टर वर लागवट करण्यात आली यावेळी झालेल्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात HTBT का आहे.2002मध्ये जगातीलदुसऱ्या क्रमाकाचे राष्ट ह्या बी टी च्या स्वीकार्य कामाने झाले, हे विकासकार्य भुलून जर सरकार गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यात सीड्स ऍक्ट मध्ये फरक दर्शवीत असतील तर, राष्ट हे एक कुटुंब हा संदेश देणारे प्रधानमंत्री खऱ्या कसूटीवर उत्तरतील काय? संविधान हक्क असताना सरकारचा हा हटास म्हणजे शेतकऱ्या विषय उदासिनता नवे काय?शेतकरी संघटनेच्या मते, शेतकऱ्यांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. शासनाने नवीन कृषी तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून राष्ट आयात धोरणा पासून मुक्त करता येथील राष्ट गरज पूर्ण करून निर्यातदार राष्ट करता येतील, त्या साठी तंत्रज्ञान अशी संघटनेची मागणी आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटपअध्यक्ष स्थांनी होते,ललित बहाळे, अनिल घनवट, प्रज्ञाताई बापट, सीमाताई नरोडे,विजय निवल, मिलिंद दामले, दीपक आनंदवार यांनी विचारमंच्यावरून मार्गदर्शन केले, यावेळी प्रथम शरद जोशी यांच्या फोटोला माल्यार्पण करून दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुर्वात करण्यात आली.ह्या वेळी समोर बोलताना सरकार येथील जातील पण अन्नदाता हा स्थिर राहतील, अन्नदाता जेव्हा आर्थिक उन्नती करतील तेव्हाच राष्ट विकशीत होतील, नेता मोठा पक्ष मोठा म्हणजे राष्ट उन्नती नव्ये तर शेतकरी मोठा तर राष्ट उन्नती, 66लाख सुशिक्षितयुवक हे बेरोजगार झाले असुन त्याचा अधिभार हा शेतीवर एणार असुन त्याच्या हक्काची जाण त्याना झाली तर —सरकार काय? ठिकावं धरून राहतील, पण शेतकरी विविध संखटाच्या वेळी स्थिर राहून आपले सत्य उजागर करतील. नवयुवकशेतकरी ह्यांनी शेतकरी संघटनेत प्रेवेश केला,त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी गजानन पारखी, सतीश देशमुख, दीपक आनंदवार, चंद्रशेखर देशमुख, दशरत पाटील, आशिष मुसळे, हिम्मतराव देशमुख बबनराव चौधरी, अक्षय महाजन, गिरीष तुरके, मोहनराव चौधरी गोपाल भोयर,कीशोर झोटींग, निलेश डवरे, दशरथ काळे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे यांच्यासह राज्यातील अकोला, बुलढाणा, नांदेड, वाशीम, चंद्रपूर सह विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी ऊपस्थीत होते यावेळी कृषी तालुका बेंडे, भोयर मॅडम व इतर साह्यक कर्मचारी विभागासह सुखदेव अवधूत भोरकडे पी एस आय व पोलिसांचा बदोबस्त होता.यांच्या उपस्थितीत HTBT बियानाची लागवट करण्यात आली, हा कार्यक्रम राजेंद्र झोटींग यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर करण्यात आला. कुटुंब एक्तेचा लढा ह्या वेळी दिसून आला, कार्यक्रमाची सांगता वज्रमुठ बांधून छपत घेऊन स्नेहभोजनातून सांगता करण्यात आली.












