सरकारी सुव्यवस्थेच्या अभावाने शेतकरी आर्थिक संकटात!शेती पंप असून सिंचनावीणा शेती!*
✍️दत्तात्रेय बोबडे
यवतमाळ संपादक
वणी:-शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दि. 11जुनच्या रात्रौ 7-30वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळीवाऱ्यास पावसाच्या तडाख्याने दानादन उडवली होती.
शेतातील आखाड्यास घरावरील पत्रे तसेच सोलर प्लॅन्ट उडाल्याने शेतकरी तसेच नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
गुरुवारी दिवसभर प्रचंड ऊन असल्याने उकाळा होता. रात्री 7:30 च्या सुमारास अचानकपणे वादळवारे सुरू होऊन,त्यानंतर लगेचच पावसास सुरुवात झाली वादळ वारी मोठ्या प्रमाणात असल्याने विजेचे तारा तुटून पडल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा 24 तास खंडीत झाला यात एक नाथ सखाराम चिणे यांच्या गट क्रमांक 39/2ब सिद्धकला कंपनी पुणेच्या सौर कृषी पंपाचे तीन तेरा वाजले असल्याने सरकारी कामाची विसंगती पुन्हा चव्हाट्यावर आली असून ग्रामपंचायत चारगावचे सरपंच शंकर नारायण वालकोंडे, उपसरपंच सौ नीलिमा ताई प्रशांत बोधडकर, कृषी सहाय्यक सुधाकर शेंडे, सचिन नावडे यांनी शेतकऱ्याच्या नुकसानीचे कारण लक्षात घेऊन घटनास्थळी पंचनामा करून घेतला, ही हानी आता शेतीपम्प असुन सिंचना अभावी शेती असे ओळख झाली असुन शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात ओढल्या जात आहे. शिरपूर परिसरात या पावसाचा मोहदा, वेडाबाई, गोपालपुर,खांदला, शिरपूर, वारगाव, शेलु बुद्रुक, बोरगाव, वरझडी सह शेकडो गावातील शेत आखाड्यावरील तसेच अनेक गावातील टिन पत्रे उडून गेली, शेतात असलेल्या अनेक सोलर प्लांट चे नुकसान झाले, या वादळातअनेक झाडे उलमळून पडली विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने अनेक गावात सकाळपर्यंत अंधारात राहावे लागले. ह्या प्रथम पावसाच्या












