✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, बल्लारपूर, राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये कार्यकारिणी बैठकींचे आयोजन करण्यात आले. या बैठका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. यावेळी जिल्हा प्रभारी केतन रेवतकर व जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

बैठकीदरम्यान प्रत्येक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा सादर केला. संघटन विस्तार, आगामी आंदोलन व कार्यक्रमांचे नियोजन, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण तसेच युवकांना काँग्रेसच्या विचारधारेशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसमध्ये नव्याने सहभागी झालेल्या युवकांचे स्वागत करण्यात आले. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवकांना पक्षाशी जोडण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी काळात युवकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे लढा उभारण्यासाठी संघटनात्मक मजबुतीवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.बैठकीत आगामी SIR प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक कार्यकर्त्यांचे नेतृत्वगुण, संघटनात्मक कौशल्य, जनसंपर्क क्षमता आणि पक्षाच्या विचारधारेविषयीची समज अधिक दृढ करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी ब्रह्मपुरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर नागतोडे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश गोनेलवार, तसेच ब्रम्हपुरी, राजुरा, बल्लारपूर युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













