✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
आरमोरी:-आरमोरी तालुक्यातील वैरागड जवळील मोहटोला येथे रिपब्लिकन पार्टीची बैठक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली तर सदर बैठकीला प्रमुख अतिथी म्हणुन रिपाई जिल्हाध्यक्ष दशरथ साखरे , मारोती भैसारे लाभले होते.
मोहटोला येथील रिपाई कार्यकर्त्यांना माहीती देतांना प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित एकमेय पक्ष असुन पुढील महिण्यात होवू घातलेल्या जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठ्या संख्येंनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही बोरकर यांनी केले.
सदर बैठकीला आरपिआयचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग सावकार ढेंभूर्णे युवा अध्यक्ष बाळू पा. ढेंभुर्णे टिकाराम ढेंभुर्ण तानू सोरते सुरज ढेंभुर्णे शंकर अबांदास ढेंभुर्णे सुधाकर ढेंभुर्ण मुनिश्वर भैसारे गोपाल ढेंभुर्णे दामोधर ढेंभुर्णे किशोर पाहुरंग ढेंभुर्णे आदि सहीत बहुसंख्य रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते. बाळू ढेंभुर्ण यांनी आभार मानले.














