संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-भामरागड तालुक्याच्या सिमावर्ती भागात व छत्तीसगड सिमावर्ती भागात माओवादी दबा धरून बसले असल्याची गुप्त माहितीच्या आधारे दि. 3 फरवरी पासुन माओवाद्यांविरोधात अभियान सुरु केले सतत तिन दिवश चाललेल्या अभियान व चकमकीत शेवटी ६फरवरी च्या सकाळी ७ माओवांघांना कंठस्थान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी , पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रभारी व कंपनी क्र . १० चा प्रभारी डिकेएसझेडसी प्रभाकरसह ०१ सिवायपिसी कंमाडर ०१ पीपीसीएम 02 एसीएम दार्जाच्या माओवाघांसह 02 सदस्य पदावरील माओवाघांना कंठस्थान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले. प्रभाकर यांना १० वेळा सांगितले की पोलीसांसमोर आत्मसमर्पण करा परंतु तो मानला नाही शेवटी त्याचाही अंत झाला. दुदैवाने जवान दिपक चिन्ना मडावी यांना विरगती प्राप्त झाली तर जवान जोगा मडावी हे जखमी झाले असुन सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल
यांनी पत्रकार परिषदेत माहीती देतांना सांगितले.
सदरचे माओवाद्याविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती ) डॉ. छेरिंग दोरजे विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान ) नागपूर संदिप पाटिल /पोलीस उप महानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल उप महानिरिक्षक (अभियान ) सिआरपिएफ अजय कुमार शर्मा गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल अप्पर पोलीस अधिक्षक एम. रमेश अपर पोलीस अधिक्षक अहेरी कार्तिक मधीरा अपर पोलीस अधिक्षक (अभियान ) गोकुल राज जी पोलीस उप अधिक्षक विशाल नागरगोजे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिक्षक अमर मोहिते भामरागड यांच्या नेतृत्वात सी ६० आणि सिआरपीएफच्या जवानांनी सदर मोहीम यशस्वीपणे राबविली व ७ माओवाद्यांचा खत्मा केला. पोलीस अधिक्षक निलोप्पल यांनी सदर भागात माओवाद्य विरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असुन पुन्हा एकदा उर्वरीत सर्व माओवाद्यांना हत्यार ठेवून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहनही जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांनी केले.
मागील दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी नष्ठ झाले असे वाटले परंतु दि. ६ फरवरी च्या चकमकीत एक जवानांना दुदैवाने विरगती येणे तर दुसरा जवान जखमी यावरून असे वाटते की नक्षलवादी पुन्हा डोके वर तर काढीत नाही ना !








