महाबोधी महाविहार मुक्ती के लिए आंदोलन जारी रहेंगा-भन्ते विनाचार्य. जंतर मंतर
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
दिल्ली:-बौद्धगया महाबोधी महाविहार की लढाई १३४ साल की है ! आजचे आंदोलन तमाम भारत आणि विश्वातील बौद्ध भिक्खु संघाच्या वतीने आज पासून लढाई सुरू केलेली आहे हि लढाई जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत हि लढाई सुरुच राहील. भारत देश हा पूर्वीपासूनच बौध्दांचा देश आहे. या देशावर विविध धर्मीयाने राजसत्ता गाजवून भारतातील बौद्ध धम्म नष्ठ करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुनश्च बौद्ध धम्माला पुर्नजिवित केले आणि तेव्हापासून भरतात बौद्ध धम्माचा उदय झाला.ईथल्या ब्रामणीय व्यवस्थेने बौद्ध धम्माच्या विरोधात षडयंत्र रचने सुरु केले त्याचाच एकभाग म्हणून बिटी एक्ट १९४९ भारतात लागु करण्यात आला पण त्या एक्टच्या विरोधात धम्मपाल अनागरिक यांनी प्रथमताः आंदोलन सुरु करून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा दिला त्यांच्या त्या लढाईने भारत सरकारने बिटी एक्ट कायदा लागु करून थातूरमातूर समिती गठित केली. अश्या पद्धतीने भारत सरकारने महाबोधी महाविहार पंड्याच्या हातात दिला हा भारतीय बौद्धांवरती झालेलाअन्याय आहे. भारत बौद्ध राष्ट्र असतांना महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावा याकरीता आज दि. १२ फरवरी २० २६ रोजी जंतर मंतर दिल्ली आंदोलन सुरु करण्यात आले .
या आंदोलनाचे मुख्य नेतृत्व पुज्य भन्ते विनाचार्य यांनी केले. भन्ते विनाचार्य यांच्यावर विश्वास ठेवून विश्वातील तमाम बौद्ध भिक्खु संघाने व बुदिष्ठ अनुयायांनी सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.

♨️या आंदोलनात खासदार चंद्रकांन्त हांडोरे केंद्रिय मंत्री रामदास आठवले ,खासदार प्रतिभा धानोरकर खासदार वर्षा गायकवाड खासदार चंद्रशेखर आझाद खासदार बर्वे , खासदार पडोले आमदार राजकुमार बडोले माजीमंत्री सुलेखा कुंभारे माजी मंत्री गौतम पाल आदिंची समायोचित भाषणे झालीत यात कांग्रेस व इतर पक्षाने समर्थन जाहीर केले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नितिन गजभिये , राकेश धारगावे ,स्मिता वाकडे , राहुल रंगारी व इतरांचे मोलाचे सहकार्य लाभले या आंदोलनात लाखोच्या संख्येसहीत रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर ॲड. विनय बांबोळे ,चंद्रपुर रिपाई नेते डॉ. गोपाल रायपुरे ॲड प्रियंका चव्हाण गायक अनिरुद्ध वणकर यांच्या सहीत चंद्रपूर – गडचिरोली जिल्हयातुन दिडसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.









