संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
मुलचेरा:-मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम भागतील रेंगेवाई – लोहारा मल्लेर ते कोठारी जाणारा पाच कि.मी च्या रस्त्याची अगदी चाळण झालेली असुन सदर रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते.
रेंगेवाई ते लोहारा सदर भाग अतिदुर्गम असुन या रस्त्यावर महामंडळाची बस कधि धावलीस नाही. परंतु आता गेल्या पाच वर्षापासून सदर रस्त्याची चाळणच झाली आहे. सदर रस्त्यावर लोहारा गावात शासकिय आश्रम शाळा असुन या गावाला विद्यार्थीना व गावकऱ्यांना रस्तावरून जातांना त्रास सहन करावा लागतो. सदर रस्त्यावर टु व्हिलर , फोर व्हिलर जाणे कठीण झाले असुन रस्त्यावरील कलवट मधील पायल्या फुटल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे गाडी कशी न्यावी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.या भागातील रस्त्याकडे विकासाच्या गप्पा मारणारेआमदार व माजी जि.प सदस्याचे दुर्लक्ष आहे. अश्या अविकसित गावाकडे मुलचेरा पंचायत समितीने लक्ष देऊन सदर रस्त्याची निविदा काढून रस्ता बनवावा अशी मागणी लोहारा ग्रामस्थानी केलेली आहे.









