✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-महाराष्ट्रअंधश्रध्दा निर्मूलन समिती गडचिरोली जिल्हा व जिल्ह्यातील संपूर्ण आश्रमशाळा मधील अंधश्रध्दा निमुर्लनाचा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा समाप्त झालाअसुन यात महाराष्ट्र निर्मुलन समितीचे राज्यकार्यकारीणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर ,अंधश्रध्दा निर्मुलन समिती गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर उपाध्यक्ष महाअंनिस विनायक रामटेके चंद्रपूर ,आदिची टिम जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलनाचा कार्यक्रम घेतला नुकताच दुसरा टप्या समाप्त झाला असुन अनेक आश्रम शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला.

गेल्या तिन दिवसात आश्रम शाळा अडयाळ , मुलचेरा , गुंडापल्ली सिरोंचा , असरअल्ली ,झिंगानूर , देचली पेठा , व्येकटापूर , बामणी ,आंबेडकर नगर , राजाराम गुड्डीगुडम, रेपनपल्ली , वेलगुर तलवाडा ,देवामारी ‘पेरमिली भामरागड , लाहेरी आदि सिरोंचा भामरागड मुलचेरा अहेरी तालुक्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर विशेष जानिव जागृती , विद्यार्थांमधे विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी व सामाजिक क्रुरप्रथा पासुन त्यांचे स्वरक्षण व्हावे हा एक कार्यक्रमाचा उद्देश होता काही चमत्कार दृश्य सुद्धा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले यात रामभाऊ डोंगरे व प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.








