✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकेवर असलेल्या कोरपणा तालुक्यात या हंगामात सोयाबीन तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शासनाच्या शासकीय दरापेक्षाही कमी दरामध्ये धान्य विक्रीची नामुश्किल शेतकऱ्यावर उडवली शासनाने नाफेड अंतर्गत महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मार्फतीने राज्यामध्ये 214 केंद्राला मंजुरी दिली कोरपणा तालुक्यामध्ये यावर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसाने खरीप हंगाम कोलमंडल्याने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चना गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे रब्बी हंगामाचा चना कटाईला सुरू झालं असून येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या दारावर धान्य खरेदी करणारे व्यापारी पोहोचून शासकीय दरापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांची कडूनकमी दरामध्ये धान्य खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करेल महाराष्ट्र शासनाने कर्नाटक व छत्तीसगड राज्यांमध्ये शेतकऱ्यांना तफावत रक्कम बँक खात्यावर टाकल्या जाते यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत नाही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे फक्त राज्यामध्ये मोजक्या ठिकाणी शासकीय दरातील खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे कोरपणा राजुरा यासह चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये यावर्षी चना पीक मोठ्या प्रमाणात भावाच्या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली आहे सध्या बोटावर मोजण्या एवढेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन-चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. विशेषता कोरपणा भागातील 15000 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात चना लागवड झाल्यामुळे कोरपणा या तालुक्यामध्ये नाफेड अंतर्गत पणन विभागाकडून तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसप्रदेश सहसचिव यांनी संचालक पुणे व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे








