संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यात पोर्ला येथे बॅक ऑफ महाराष्ट्र चे कार्यालय थाटले आहे परंतु ग्राहकाचे’ बिमारांचे ,समाधान होत नसल्याचे दिसते या बॅकेचा जनु भोंगळ कारभार सुरु असल्याची ओरड पोरला परिसरातील ग्राहकांची आहे.
दि. २५ फरवरी ला काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर बीमार होती तिला उपचार व औषधी साठी पैशाची गरज होती तेव्हा तिने विड्राल वर सही मारून नातेवाईकाला बॅकेतून पैसे काढायला पाठविले. तीचा जावई व मुलगी पोरला येतील रहिवासी असून त्यांनी तिच्या अंगठ्याचा ठसा घेऊन बँकेमध्ये पैसे काढण्याकरिता आले परंतु शाखा व्यवस्थापक यांनी पैसे देण्यास नकार दिला व तुम्ही खातेधारकाला हजर करा असं सांगून वापस केले शेवटी किरायाची गाडी घेऊन कोमात गेलेल्या अवस्थेत खातेधारकाला आणण्यात आले परंतु बँकेचे कोणतेही कर्मचारी पाठवून मोका चौकशी करण्यात आली नाही असा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला. निराश ग्राहक व ग्रामस्थाने ग्रामसभेत शाखा व्यवस्थापक व उपशाखा व्यवस्थापक यांच्या विरोधात ग्रामसभेमध्ये त्यांच्या बदलीचा ठराव घेऊन त्यांची तात्काळ बदली करण्याबाबत व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत ठराव घेण्यात आलेले आहे त्यांची गावातील खातेदारकांसी व गावा सभोवताली खातेदारकांसीअसभ्य वागणूक आहे त्यामुळे गावातील व सभोवतातील खातेधारक बॅक मॅनेजर त्यांच्यामुळे त्रस्त झालेले आहेत कोणत्याही खातेधारकांना कोणतीच माहिती देण्यात येत नाही त्यामुळे शाखा व्यवस्थापक व त्यांचे सहकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी व कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांची केली आहे.








