✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:– इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस हायस्कूल राजुरा येथे आनंददायी रविवार या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. नर्सरी ते इयत्ता चौथी च्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी आनंददायी रविवार या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसह विविध खेळ, नृत्य आणि संगीत अशा विविध शालेय उपक्रमाचा आनंद घेतला यात प्रामुख्याने प्री प्रायमरी मधील पालक- विद्यार्थ्यांसाठी बॅलेन्स द कोन , ब्रेस्ट द बलून , बॅलेन्स द कप , कॅच द कप इन कोन आणि इयत्ता 1 ते 4 वर्गातील विद्यार्थी – पालकांसाठी कॅरिंग ऑन बॅक, मार्बल रेस , सँडविच कॅरी पासिंग बॉल रेसिंग , रस्सीखेच या खेळाचा पालकांनी आपल्या पाल्यासोबत या स्पर्धांमध्ये आनंदाने सहभाग घेतला. 👇👇👇👇👇👇

आनंददायी रविवार या उपक्रमाच्या माध्यमातून पालक विद्यार्थी व शाळा यांच्यामध्ये असलेले नाते अधिक दृढ झाले. खेळ, मनोरंजन आणि सहकार्य यांच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. अनेक पालकांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा उपक्रमामुळे शाळा आणि कुटुंब यांच्यातील सुसंवाद वाढतो असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली धानोरकर यांनी तर आभार प्रदर्शन विवेक उरकुडे यांनी मानले. यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, व स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.







