संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
ब्रम्हपुरी:-धम्ममाला फॉऊडेशन ब्रम्हपुरी तर्फे ८वी बौद्धधम्म परिषद दि. २२ मार्च २०२६ ला दुपारी १२ वाजता राजीव गांधी सभागृह खुर्झा रोड ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष भंदन्त आनंद महाथेरो बुद्धगया अध्यक्ष अखिल भारतिय भिक्खू महासंघ उदघाटक मनोज काळबांधे नागपूर धम्मदेशना करणारे भदंन्त सत्यानंद महाथेरो येनाडा भदन्त प्रज्ञानंद महाथेरो नागपूर स्वागताध्यक्ष विनोदकुमार माटे ब्रम्हपुरी प्रमुख मार्गदर्शक भाग्यवान खोब्रागडे आरमोरी ॲड. राम मेश्राम गडचिरोली प्राचार्य डॉ. देवेंद्र कांबळे ब्रम्हपुरी डॉ. राजकुमार शेंन्डे ब्रम्हपुरी प्रा. नोमेश मेश्राम आरमोरी प्रा. शशीकांत गेडाम आरमोरी पि.एस खोब्रागडे नागपूर तर प्रमुख पाहुणे म्हणुन अशोक रामटेके ब्रम्हपुरी राजेश कांबळे ब्रम्हपुरी इंजि. विजय मेश्राम वडसा मदन मेश्राम आरमोरी प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली पत्रकार नेताजी मेश्राम ब्रम्हपुरी जिवन बागडे ब्रम्हपुरी मनिष हुमने ब्रम्हपुरी अरविंद घुटके वडसा आदि लाभणार आहेत.
तरी होवु घातलेल्या बौद्ध धम्म परिषदेला बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक गुणवंत डोर्लीकर यांनी केलेले आहे.









