संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:–
सार्वजनिक आरोग्य व जनतेचा आरोग्यसाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस राज्य शासनाने महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार गायक विजय शेंन्डे चुरमुरा यांना जाहीर केला आहे. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
गायक विजय शेंन्डे हे विदर्भात आंबेडकरी चळवळीतुन समाज कार्य करीत आहेत. ते व्यसनमुक्ती बाबत अनेक गावात कार्यक्रम आयोजित करून प्रचार व प्रसार व्यसनमुक्तीसाठी कार्य केले आहे त्यामुळे गायक विजय शेंन्डे यांना शासनाने व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर केला आहे.
सदर योजनेअंतर्गत त्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व साडी चोळी व १५ हजार रुपये देऊन विजय शेन्डे यांचा सत्कार केल्या जाणार आहे. त्यांना मिळणाऱ्या व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार बद्दल त्यांचा अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.








