संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील घोट गावातील पाणी पुरवठा गेल्या सहा महिण्यापासुन बंद पडली आहे तो पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न घोट ग्रामपंचायत कडून होत असल्याची माहीती घोट ग्रामपंचायतचे सरपंच रुपाली दुधबावरे यांनी दिली.
सन २०२५ ला २२ कोटीची पाणी पुरवठा योजना ठेकेदारांनी पूर्ण केली परंतु अवघ्या दोन चार महिण्यातच पाईप लाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद पडला पाण्याची टॉकी ७ कि.मी पासुन आलेली आहे. घोट ग्रामपंचायत मधे पुन्हा तिन – चार गावे येतात ते संपूर्ण गावे घोट ग्रामपंचावर अवलंबून आहेत. पाण्याची ओरड गावकऱ्यांकडून होत आहे. पाणी हे जीवन आहे याची कल्पना मला आहे. म्हणुन बंद पडलेली पाणी पुरवठा योजना पुर्वरत सुरु करण्याचा माझा प्रयत्न आहे. उन्हाळा सुरु झाला त्यामुळे घोट वासियांना पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणी पुरवठा लवकरच सुरु करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत संध्या घोट वासीय विहीरीच्या पाण्याने आपली तहान भागवित आहेत.








