गडचिरोली:-मोठ्या लोकांचा वाढदिवश कुणीही साजरा करतात परंतु तळागळातील कार्यकर्त्यांचा वाढदिवश केला म्हणजे त्यांना फार आनंद होतो. जे कार्यकर्ते पक्षाप्रती व समाजाप्रती सदैव झटतांत अश्या कार्यकर्त्यांचा सत्कार रिपाई तर्फे केल्या जातो अश्या प्रकारचे मार्गदर्शन आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले .
रिपाईचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुरेंद्र राजवाडे यांचा ७५ वा वाढदिवश त्रिरत्न बुद्ध विहार गोकुळनगर गडचिरोली येथे रिपाई नेते गोपाल रायपूरे यांच्या अध्यक्षतेखाली तर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर रिपाईचे जेष्ठ नेते अॅड शांताराम उंदिरवाडे बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर उपाध्यक्ष दशरथ साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
डॉ. सुरेंद्र राजवाडे व सामाजिक कार्यकर्ता संघमित्रा राजवाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रंसगी गोपाल रायपुरे भोजराज कान्हेकर लता भैसारे यांनी डॉ.राजवाडे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचलन प्रमोद राऊत यांनी केले. कार्यक्रमास लवकुश भैसारे शिद्धार्थ भानारकर जैराम उंदिरवाडे डोमाजी गेडाम प्रेमदास रामटेके रोशन उके जिवन मेश्राम राजु वनकर चोखोबा ढवळे लता रामटेके रजनी खैरे सत्यभामा कोंटागले अहिल्याबाई सहारे नालिनी उंदिरवाडे शांताबाई रामटेके शेंवता जांभुळकर निर्मला ढेंभुर्णे प्रज्ञा लाळे प्रेमलता कान्हेकर सुनंदा ढेंभुर्णे मयुरी भैसारे पल्लवी बडोले अमिता भैसारे सोनु कऱ्हाडे वृक्षाली उंदिरवाडे मोनिका ठेंभुर्णे लिला वाकडे आशा हुमणे अमिता भैसारे सहित बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.








