✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-कोरपना
सुराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विसोरा, येथील कार्य कुशल व उपक्रमशील शिक्षिका कुमारी अश्फिया कय्युम सिद्दीकी यांना दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
कुमारी अश्फिया कय्यम सिद्दिकी यांनी आपल्या सेवेची सुरुवात सन 2010 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी तालुका कोरची येथून केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी ज्ञानदानाचे उत्तुंग कार्य अविरत सुरू ठेवले व त्यासोबतच अनेक शासकीय उपक्रमांमध्ये आपला कृतीयुक्त सहभाग नोंदविला. बहुभाषिक जिल्ह्यात कार्यरत असून देखील कु. अश्फिया सिद्दिकी अबरार अली यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन करीत ब्रिटिश कौन्सिल द्वारे राबविण्यात आलेले ELIPS, TEJAS , TAG Co-Ordinator, Spoken English इत्यादी उपक्रमांमध्ये मास्टर ट्रेनर ची भूमिका यशस्वीरित्या बजावली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ “बालभारती” द्वारे सन 2018 मध्ये निर्मित इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये देखील कु. अश्फिया सिद्दिकी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या विशेष व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ब्रिटिश कौन्सिल द्वारे सन 2019 मध्ये त्यांची निवड ( IATEFL Conference) आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा परिषदेसाठी करण्यात आली व त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व लिव्हरपूल, इंग्लंड येथे केले. सन 2018 ते 2021 पर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे गणित विषयासाठी कार्य करून संपूर्ण जिल्ह्या तील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विशेष सहकार्य केले. दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विविध डिजिटल साधनांचा वापर व नावीन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धती द्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्नरत आहे.
सुराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात व अतिदुर्गम भागात विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बहुआयामी शिक्षकांचा मागोवा घेत कु. अश्फिया सिद्दिकी अबरार अली यांना सन 2026 मध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला व त्यांच्या अलौकिक कामगिरी बद्दल त्यांचा जाहीर सत्कार केला.
कु. अश्फिया सिद्दिकी यांनी पुरस्काराचे श्रेय आपल्या आई व पती अबरार अली यांच्या मेहनतीला दिले. त्यांच्या यशात कुटुंब शाळा व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य आहे








