वणी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आदर्श परिवर्तन बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वणी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
🌴या उपक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दोडके, उपाध्यक्ष धीरज भोयर व सचिव आकाश मत्ते यांनी केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी डॉ. स्वप्नील गोहोकार, संदीप गोहोकार, ॲड.राहुल खारकर,अनिकेत मोहितकर, अमित उपाध्ये, आयटीआयचे प्राचार्य तेलतुंबडे सर, आकाश मत्ते सर, महेश राऊत सर, योगेश बुरटकर तसेच आयटीआयचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह आयटीआय प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.













