✍️मुनिश्वर बोरकर संपादक
गडचिरोली:-शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा त्यांचा मोठा परतावा मिळू शकतो म्हणुन अनेक शेअर मार्केटच्या कंपन्या सुरु आहेत त्यातूनच अनेकांना आमिष दाखवून झरपट श्रीमंत होण्याचा हव्यापायी गडचिरोलीच्या अनेकांची फसवणुक केल्याचे निदर्शनास येत असुन संध्या दोन जनांची ६५ लाखानी फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गडचिरोलीच्या माडेतुकम येथे राहणारा व्यवसायाने कर सल्लागार म्हणुन काम करीत असणारा रुपेश पुंडलिक भुरसे वय ४१ वर्ष यांना सायबर भामटयांनी मेसेज करून ‘ टोटॅम इन अँपच्या जाळ्यात ओढले त्यांनी गुणतकुची नावाखाली २१ लाख रुपये झटपट श्रीमंत होण्याचा नादात भरले मात्र लाभ काहीच मिळत नसल्याचे भुरसे यांच्या लक्षात येताच त्यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमधे तक्रार दाखल केली आहे. तर तहसिल कार्यालयमधे जमीन विक्रीचा व्यवसाय करणारे टॅम्प व्हेन्टर दत्तु कळमकर यांना बगळून येथील अनया अग्रवाल यांनी गुंतवणुक करा तुम्हाला भरपुर लाभ होइल या हव्यासापोटी यांनीही झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी टप्याटप्याने तब्बल ४४ लाख रुपयांची गुणतंणूक केली व दत्तु यांचीही फसणणुक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनीही गडचिरोली पोलीस स्टेशनमधे रिपोर्ट दिला. शेअर मार्केटने गडचिरोलीतअश्या अनेकांची फसवणूक होत असल्याचे बोलल्या जात आहे. सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरु आहे.
सतर्क राहण्याचा पोलीसांचे आवाहन –
अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून गुतं वनणुक करणे याचे फार मोठे नुकसान होवू शकते तेव्हा अश्या कपन्यापासुनन नाकरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन पोलीसांनी केलेले आहे












