✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
चंद्रपूर:-प्रेरणा शिक्षण संस्था मंडळ शिदेवाही चिचपल्ली महाविघालयचे संस्थापक प्राचार्य रमेशचंद्र राऊत चंद्रपूर यांचे सुपत्र प्राचार्य शिद्धार्थ रमेशचंद्र राऊत चिचपल्ली यांचे दि. १८ जुलै दुपारी १२ वाजता खाजगी रुग्णालय चंद्रपूर येथे निधन झाले.
प्राचार्य शिद्धार्थ रमेशचंद्र राऊत यांना दवाखाण्यात भरती करण्यात आले होते परंतु त्याचे दुःखद निधन झाले. त्यांचा मृत्युदेह बंगाली कॅम्प चंद्रपूर येथून आजच ४ वाजताच्या दरम्यान स्मशानभुमीत नेणार येणार असुन त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येइल प्रा. शिद्धार्थ यांचे पश्चात आई – वडील भाऊ व पत्नी (रामटेके ) ची मुलगी गोकुळनगर गडचिरोली अशा परिवार असुन त्यांच्या दुःखत निधनामुळे राऊत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.















