फुकटनगरमधून 1 किलो 193 ग्रॅम गांजा जप्त, 24 हजार 500 चा मुद्देमाल
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : अंमली पदार्थांविरोधात भद्रावती पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत फुकटनगर परिसरातील 60 वर्षीय गांजा विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत 1 किलो 193 ग्रॅम ओलसर गांजा आणि मोबाईलसह एकूण 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
💥💥आरोपीचे नाव संजय माणिक सोनुणे (60), रा. फुकटनगर, भद्रावती असे आहे.भद्रावती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा यांना गुप्त माहिती मिळाली की, सोनुणे हा घरातून गांजाची किरकोळ विक्री करतो. माहितीची खातरजमा करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन मध्यरात्री साडे बारा वाजता पोलिसांनी पंच, मापारी, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफरसह घरावर छापा टाकला.
झडतीत बेडरूममधील ड्रमच्या मागे पिवळ्या पिशवीत प्लास्टिक पन्नीत लपवून ठेवलेला 1 किलो 193 ग्रॅम गांजा सापडला. त्याची किंमत 24 हजार रुपये आहे. आरोपीकडून 500 रुपये किमतीचा जिओ मोबाईलही जप्त करण्यात आला. सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आला.
चौकशीत आरोपीने हा गांजा चंद्रपूरच्या गंज वॉर्डातील विलास पाड याच्याकडून खरेदी करून किरकोळ विक्रीसाठी आणतअसल्याचे सांगितले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 8(सी), 20(बी)(ii) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि वीरेंद्र केदारे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
👉भद्रावतीत 60 वर्षीय गांजा विक्रेता अटकेत
भद्रावती पोलिसांनी फुकटनगर येथील संजय सोनुणे याच्या घरावर मध्यरात्री छापा टाकून 1 किलो 193 ग्रॅम गांजा जप्त केला. मुद्देमालाची किंमत 24 हजार 500 रुपये. आरोपीने चंद्रपूरमधून गांजा आणून विक्री केल्याची कबुली दिली. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल.













