👉मृत शवावर शवविच्छेदन करतेवेळी गडते पावसाचे पाणी…
👉शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात…
👉शासन व प्रशासनाकडून होत आहेत प्रेताची विटंबना…
👉शेवविच्छेदन रूम तात्काळ बांधण्याची जनतेची मागणी…
✍️प्रविण रोगे
वणी
वणी:-तालुक्यातील वणी ग्रामीण रुग्णालय येथील मृतकांचे शवविच्छेदन केल्या जाणाऱ्या शवरूमची दुरवस्था.




💥वणी तालुका खूप मोठ्या लोकसंख्या असलेल्या तालुक्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव तालुका आहेत व परिसरात खूप मोठे उद्योग धंदे असून दळणवळण वाहतूकही दरडोई मोठ्या प्रमाणात चालू असते त्यामुळे एक्सीडेंट सारख्या अनुचित घटना तसेच अनेक प्रकारे दरडोई मृत पावणाऱ्यांची संख्या बऱ्याच पैकी आहेत त्यानुसार वनी येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी बऱ्याच वर्षापासून स्थगित असून लोकसंख्येच्या दृष्टीने वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणे फार गरजेचे होते परंतु काही राजकीय घडामोडीमुळे शासन व प्रशासन यांचे या बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष असून आवश्यक असलेल्या आरोग्य विषयक मोठ्या सेवा सुविधेपासून तालुक्यातील जनसामान नागरिक वंचित राहिलेला आहेत त्याचबरोबर रुग्णालयात असलेले शवविच्छेदन रूम ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीच्या काळापासून केवळ एक रूम असून आता ती रूम संपूर्णपणे मोडकळीस आलेली आहेत व आता क्षणी रूममध्ये ठेवलेल्या मृत शवावर रूमचे छता मधून पावसाचे पाणी गळती सातत्याने सुरू आहे त्याचबरोबर रूम मोडकडी झाल्यामुळे रूममध्ये संपूर्ण गंदगी पसरलेली आहेत रूमच्या दरवाजे खिडक्या सुद्धा पडलेल्या अवस्थेत असून छताचा स्लॅब सुद्धा पडलेला आढळून आला असून शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रूमच्या छताचा स्लॅब पडून धोका निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नसून यदाकदाचित रूमच्या छताचा स्लॅब पडून जीवित हानी होण्याची शक्यता टाळता येत नाही याकरिता शासन व प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून ताबडतोब शवविच्छेदन रूम निर्मितीसाठी लक्ष द्यावेत अशी मागणी तालुकास्तरावरून होत असून मृत व्यक्तींच्या जिवाची विटंबना होत असल्याचे बोलले जात आहेत याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार व खासदार यांनी या बाबींकडे तात्काळ लक्ष घालून नवीन शव विच्छेदन रूम उभारण्यास मदत करावे अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहेत…

















