✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि National Health Systems Resource Centre (NHSRC), नवी दिल्ली यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (National Quality Assurance Standards – NQAS) या अत्यंत मानाच्या राष्ट्रीय मूल्यांकनात आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर – आरोग्य उपकेंद्र रेखेगाव (AAM SHC Rekhegaon) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर नामांकित स्थान मिळवले आहे.
काय आहे ‘NQAS’ प्रमाणपत्र?
NQAS (राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके) ही सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी भारत सरकारने निश्चित केलेली मानके आहेत. यामध्ये आरोग्य केंद्राची स्वच्छता, औषध पुरवठा, रुग्णांचे अधिकार, संसर्ग नियंत्रण (Infection Control), दस्तऐवजीकरण, उपचारांची गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा यांसारख्या ८ प्रमुख मानकांवर (Areas of Concern) अतिशय कडक पाहणी करून हे प्रमाणपत्र दिले जाते.
८५.९६% गुणांसह राष्ट्रीय मानांकन:
दिनांक २४ जून २०२६ रोजी NHSRC नवी दिल्लीच्या केंद्रीय तज्ज्ञ समितीद्वारे घेण्यात आलेल्या आभासी मूल्यमापनात (Virtual Assessment) १२ सेवा पॅकेजेसच्या निकषांवर रेखेगाव उपआरोग्य केंद्राने ८५.९६% गुण मिळवून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र’ (Quality Certified with Conditionality) प्राप्त केले आहे.
प्रमुखांचे मनोगत व अभिनंदन:
⏏️राष्ट्रीय स्तरावरील NQAS मानांकन मिळवणे ही गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव पाठीशी आहे. या उत्कृष्ट यशाबद्दल आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.”
— श्री. अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली
🚨”ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेवर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सदैव कटिबद्ध आहे. रेखेगाव उपआरोग्य केंद्राला मिळालेले हे राष्ट्रीय NQAS नामांकन हे स्थानिक आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.”
— श्री. सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली
”या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी स्थानिक आरोग्य पथकातील सौ. शुभांगी दिवाकर बारसागडे (समुदाय आरोग्य अधिकारी ),आरोग्य सेविका सौ. वंदना आंद्राओ मडावी , सौ. शीतल धनराज चारडुके आणि आरोग्य सेवक श्री. आकाश खुशाल कारंडे यांचे अभिनंदन केले आहे
गुणवत्ता कक्षाचे मोलाचे योगदान –*u गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेच्या चौकटीत आणण्यासाठी NQAS टीम गडचिरोली चे तांत्रिक मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहेत.यामध्ये वरिष्ठ सल्लागार (दक्षता) डॉ. अनुपम महेशगौरी,क्वालिटी अश्युरन्स समन्वयक डॉ. शिल्पा खोब्रागडे, डॉ दीक्षांत मेश्राम, डॉ अपूर्वा आकरे, कार्यक्रम सहाय्यक वैशाली चौधरी यांनी प्रशासकीय समन्वय व डॉक्युमेंटेशनची जबाबदारी चोख बजावली. या संपूर्ण जिल्हास्तरीय टीमच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हे यश शक्य झाले आहे.














