गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
पोटेगांव:-दि. 30 जुलै च्या रात्रौ आलेला मुसळधार पावसामुळे पोटेगांव वरून जाणारा रस्ता पोटेगांव जवळील नदि तुंळुब भरल्यामुळे घोट रेगडी जाणारा रस्ता बंद झाला तर पोटेगांव – राजुली रोड ते पुढे जाणारा रस्ता नदिच्या प्रवाहामुळे बंद झालेला असुन पोटेगांव ते कुनघाडा रस्ता सुद्धा बंद पडला आहे. रस्तावर पाणी वाहत आहे त्यामुळे पोटेगांव सर्कल मधील
२० ते २५ गावाचा संपर्क तुटला आहे. अजुनही पावसाचा जोर कायमच आहे.
पोटेगांव ते रेगडी राजुली व कुनघाडा मार्ग बंद पडल्यामुळे सदर परिसरातील वाहनधारक गडचिरोली वरून रेगडी जारावंडी जाणारी बस बंद आहेत. शालेय विद्यार्थी घराबाहेर पडू नये अशा ईशारा पोटेगांव पोलीस मदत केंद्राकडून देण्यात आलेला आहे. पोटेगांव परिसरातील काही गावातील पडकी घरे पडली अजुन पावसाच्या पाण्यामुळे शेतामधुन पाणी वाहत असुन शेतकर्यांचे अथोनाथ नुकसान झालेले आहे. मागील वर्षी राजुली गावात पाणी शिरले होते तेव्हा १० -१५ घराची नुकसान झाली होती. सदर भागात तहसिलदांनी लक्ष देण्याची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुजुमकर पोटेगांव यांनी बोलतांना सांगीतले.















