✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील नवरगाव येथील नवगांव ते पोर्ला जाणाऱ्या रस्यावरील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे हत्तीचा कळप नवरगांव जवळील मोडक फार्म हाऊसच्या पहिलेच अडकले.
कालच्या रात्रौच हत्तींचा कळप नवरगांव जंगलात आलेला होता. बुधवारी रात्रोच्या सततधार पावसामुळे नवरगांव जवळील छोटा पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे हत्तींचा कळप अडकला होता. आज दि. 30 जुलै सकाळी नवरगांव वासीय पुलाकडे पोर्ला मार्ग जात असताना हत्तींचा कळप नवरगांव वासीयांना शेतामधे शेतकर्यांचे रोवणे तुडवितांना दिसले.हत्तीच्या कळपाने पुलावरून न जाता ते नवरगांव येथील रवि भैसारे , राजहंस जांभुळकर , विलास धाकडे आनंदराव भैसारे मनोज राऊत सहीत १० ते १२ शेतकऱ्यांचा शेतातील रोवणे तुडविले त्यामुळे शेतकर्यांची अथोनाथ नुकसान झालेली आहे.
नवरगांव पोर्ला जंगल परिसरात आलेल्या हतीच्या कळपाविषयी वनविभाग पोरला चे RFO व कर्मचारी अनभिज्ञ आहेत. रात्रौ चा मुसळधार पाऊस व पोरला नवरगांव रस्ता पावसाच्या पाण्यामुळे बंदच आहे. संध्या हत्तींचा कळप नवरगांव जंगलात ठाम मांडुन आहे. वनविभाग पोर्ला कर्मचार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे व शेतकर्यांचा झालेल्या रोवण्याचे पंचनामा करून नुकसान भरपाई घ्यावी अशी नवरगांव वासीयांची मागणी आहे. मागील वर्षी याच पुलाच्या खाली झुडपाला धरुन एक प्रवासी अडकला होता.















