₹8.36 लाखांचा विदेशी दारूसाठा व स्विफ्ट कार जप्त, चालक फरार
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : नागपूरहून चंद्रपूरकडे तस्करीसाठी नेण्यात येत असलेल्या विदेशी दारूसह स्विफ्ट कार भद्रावती पोलिसांनी गुरुवारी पहाटे जप्त केली. पोलिसांचा पाठलाग सुरू असताना चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, MH-04-HF-1208 क्रमांकाची मारुती स्विफ्ट ZDI कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. त्यानुसार भद्रावती टप्पा येथे पहाटे 5 ते 6.30 वाजता नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी पाहताच चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने चंद्रपूरकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता मौजा घोडपेठ गावाजवळ चालक कार सोडून अंधारात पळून गेला.
शोधादरम्यान घोडपेठ येथील शंकर हेअर सलूनसमोर बेवारस कार आढळली. पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा होता.
या कारवाईमध्ये ऑफिसर चॉईस 180 m – 1,728 निप्पा, किंमत ₹2,95,488, ऑफिसर चॉईस 90 ml – 480 निप्पा, किंमत ₹41,280, स्विफ्ट कार – किंमत ₹5,00,000 एकूण मुद्देमाल : ₹8,36,768 जप्त करण्यात आले.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 710/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध सुरू आहे.
🚨ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे पथकाचे पो.उप.नि.संतोष केदार,पो.हवा.गजानन तुपकर, सफौ.महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टुनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो. अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आदींनी यशस्वीपणे पार पाडली.
₹8.36 लाखांचा दारूसाठा जप्त, चालक फरार
भद्रावती पोलिसांनी नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नाकाबंदीत स्विफ्ट कारमधून ₹8.36 लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त केला. पोलिसांना पाहून चालक घोडपेठ येथे कार सोडून पळाला. कारमध्ये 1728 निप्पा दारू सापडली. दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.














