गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यासाठी गडचिरोली जिल्हा कांग्रेस पार्टी तर्फे अनेकदा आंदोलन केलीत परंतु महाराष्ट्र शासनाने कोणत्याही उपाय योजना करण्यासाठी तयार नाहीत उलट हिणवण्याचे काम सरकार कडून होत आहे म्हणुन आता

महात्मा गांधीजीचा आदर्श डोळयासमोर ठेवून येत्या ९ ऑगष्ट क्रांतीदिनापासुन राजीव भवन इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे ‘ चरखे के पास चर्चा ‘ गडचिरोलीच्या जनतेच्या प्रश्नावर थेट संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यात जेष्ठ राजकारणी समाजसेवक विचारवंत जेष्ठ पत्रकार यांना सहभागी करून घेणार आहोत अशी माहीती कांग्रेसचे नेते महेंद्र बाम्हणवाडे यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली.
पत्रकार परिषदेत कांग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्रामणवाडे , जि.प चे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरेटी कांग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर अनिल कोठारे माजी सरपंच दिवाकर निसार तालुका अध्यक्ष वसंत राऊत प्रमोद भगत आदिची प्रमुख उपस्थिती होती.
महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगीतले की मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मागील आठ महिन्यापासुन गडचिरोली जिल्हयाकडे डुंकुनही पाहीले नाही ऑगष्ट महिण्यापर्यत ९ महिने उलटतील त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले नाही तर गैरहजर राहणाऱ्या पालकमंत्र्यांची वर्षस्फृती साजरी करण्याचा कांग्रेस निर्णय घेइल.
जल जंगल जमीनीचे रक्षण झाले पाहीजे. जि.प च्या ५० शाळा बंद होणार आहेत त्या बंद करू नये , रानटी हत्ती व वाघ या प्राण्यामुळे शेतकरी संघर्ष करीत आहे अश्या जंगली हिंस प्राण्यांचा शासनाने बंदोबस्त करावा. लॉयन्स मेंटल प्रकल्पामुळे सुरजागड एटापल्ली अहेरी च्या नागरिकांना असुद्ध पाणी प्यावे लागतो. आरोग्य व्यवस्था डासळली आहे अॅम्बुलन्स अभावी रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागतो मालेरियांचे पेंशन्ट वाढत आहेत शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकर्यांच्या जमीनी अधिग्रहण करू नये आदि विविध समश्या घेऊन अहिसंक मार्गाने ९ ते १५ ऑगष्ट २०२६ पर्यत कांग्रेस आंदोलन करणार अशा ईशाराही कांग्रेस नेते महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला.
पत्रकार परिषेदत कांग्रेसचे कार्यकर्ते कांग्रेसचे नगरसेवक सतिश विधाते मिलिंद बारसागडे विजय लाळ स्वप्नील बेहरे साहिल वडेट्टीवार श्रीनिवास ताटपल्लीवार रामचंद्र भांडेकर मारोती कावळे मिनल चिमुरकर शितल ठवरे विमल भोयर मनोहर गेडाम अमित गावतुरे योगेंद झंझाड गुरुदास ठाकरे आदि सहीत बहुसंख्य कांग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते














