✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे गर्भवती महिला डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे दगावली त्यामुळे जबाबदार असणाऱ्या डॉक्टरावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी प. स. सदस्या अमिता मडावी यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे.

✍️दि. 23.08.2026 रोजी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे सौ. जिजा हंसराज सातार, वय 25 वर्षे, रा. जामगिरी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली ही महिला 8 महिन्यांची गर्भवती असल्याने तिला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे भरती करण्यात आले होते.
सदर महिलेला प्रसुतीपूर्वी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथून महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आल्याने सदर महिलेला दुपारी 12.30 वाजता महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले होते. महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे तपासणी दरम्यान सदर गर्भवती महिलेचे बाळ पोटातच दगावल्याचे निष्पन्न झाले व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मृत बाळास बाहेर काढले.
परंतु सदर महिलेला रक्त कमी असल्याने तिला शस्त्रक्रियेदरम्यान 2 बॉटल रक्त देण्यात आले. मात्र रक्तस्त्राव बंद न झाल्याने सदर महिलेचे HB ४ग्रॅम वरून 2 ग्रॅम वर आले व तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील अतिदक्षता विभागात (ICU) भरती करण्यात आले . सदर ठिकाणी गर्भवती महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला डॉक्टरांच्या निकाळजी पणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यु झाला तसेच जिल्हा शल्य चिकित्सक ह्या सुद्धा जबाबदार आहेत त्यामुळे डॉक्टरावर कारवाई व्हावी असे सामाजिक कार्यकर्त्यां तया माजी प. स सदस्या अमिता मडावी हिने शासनाकडे केलेली आहे सदर गर्भवती महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात येत आहे.














