✍️मुनिश्वर बोरकर संपादक
गडचिरोली:-आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ कृती समिती अंतर्गत गडचिरोली जिल्हा वर्धापन दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या सामाजिक संघटना राजकिय संघटना पत्रकार डॉक्टर प्राध्यापक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला.आकाक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन 20४७ कृती समिती अंतर्गत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथील राजीव भवनात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा जेव्हा वेगळा झाला यात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी काही महत्वाच्या व्यकीचा शिहांचा वाटा आहे. परंतु आजतागत पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास झाला नाही. आजही रस्ते बरोबर नाहीत सुरजागड प्रकल्याच्या जड वाहतुकीमुळे खंड्यात रस्ते कि रस्तात खंड्डे अशी रस्त्याची दैनिक अवस्था आहे. आरोग्याचे तिन तेरा वाजले आहेत अपुरे डॉक्टर आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बरोबर नाही काही गावात अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे रोगराई निर्माण होत आहे. शैक्षणिक दृष्टीकोनातून आश्रम शाळेत विद्यार्थी मृत्यु पावत आहेत त्यामुळे आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा विचार करून विकास आराखडा अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावून व्हिजन २०४७ गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे.मी जरी भाजपाचा नेता असलो तरी सर्व पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वकील ठेकेदार साहित्यीक आदिनी माझ्या कार्याला सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. याप्रसंगी माजी आमदार देवराव होळी यांनी विविध राजकिय पक्षाच्या कार्यकर्ता पत्रकार सामाजिक चळवळीतील नागरिक डॉक्टर वकील आदि मान्यवरांना शाल श्रीफळ व शिल्ड देऊन सत्कार केला.कार्यक्रमांचे संचालन गायक विजय शेंन्डे यांनी तर आभार उमेश उईके यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील मान्यवर जानकार व्यक्ती सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.














