गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर
चंद्रपूर:-दि. 28:08:2026रोज शुक्रवारला दुपारी 12:30वाजता सिध्दार्थ बुद्ध विहार सिध्दार्थ नगर तुकूम चंद्रपूर येथे आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी व सिध्दार्थ बुद्ध विहार समिती सिध्दार्थ नगर तुकूम चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास व पोर्णिमेचे महत्त्व लक्षात घेऊन जातक कथांचे व्यवस्थापनाती शिद्धार्थल महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मान. डॉ जसबीरसिंग चावला आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक चंदीगड(पंजाब)हे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खुशालजी तेलंग सर आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक, उद्घाटक म्हणून मारोतराव रायपुरे सर अध्यक्ष सिध्दार्थ बुद्ध विहार समिती सिध्दार्थ नगर तुकूम चंद्रपूर तर प्रमुख अतिथी म्हणून लोकनाथ यशवंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक कवी तसेच मान. प्रा.डाॅ इसादास भडके अध्यक्ष आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी हे उपस्थित होते.प्रमुख वक्ते मान. डॉ जसबीरसिंग चावला यांनी जातक कथांचा आपल्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात व

व्यवस्थापनातील महत्त्व विविध उदाहरणे देऊन सखोल मार्गदर्शन केले, यावेळी कवी मान. लोकनाथ यशवंत यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. मान. मारोतराव रायपुरे यांनी द्विप प्रज्वलित करून तथागत भगवान गौतम बुद्ध व डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो प्रतिमाना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.मान तेलंग सर यांनी संत कबीर,संत गुरू नानक यांचे उदाहरणे दाखले देऊन समाजाभिमुख कार्याची ओळख करून दिली.या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्धांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून सामुहीक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान शुध्दोधन मेश्रामसर व आभारप्रदर्शन आयुष्यमान नागेश सुखदेवे सर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी चे अध्यक्ष मान.डाॅ.इसादास भडके,आयुष्यमान विजय जांभुळकर व इतर सदस्य तसेच सिध्दार्थ बुद्ध विहार समिती चे आयु.बी.एस.वाघमारे सहसचिव,आयुष्यमान सुनील साव कोषाध्यक्ष,आयुष्यमान किशोर साव,आयुष्यमान दयाळ वाळके,आयुष्यमान सतिश रामटेके सचिव,आयुष्यमती छायागडलिंग,आयु.रीना रायपुरे,आयु.कलावती नळे,आयु.सुलभा देठे उपाध्यक्ष ,आयु.वैशाली वाघमारे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला विहारपरीसरातील व चंद्रपूर शहरातील अभ्यासू गणमान्य समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.













