गडचिरोली -मुनिश्वर बोरकर RPI
घोट:-चामोर्शी तालुक्यातील पोलीस स्टेशन घोट येथील पोलीसांना रक्षाबंधनाच्या दिवशी घोट च्या माहिती अधिकार पोलीस मित्र भगिनींनी भाऊ बंदकीच्या नात्याने राख्या बांधल्या.
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात नव्यानेच रुजु झालेले सहा पोलीस निरीक्षक कल्पेश खारोडे पोलीस स्टेशन घोट बरडे पोलीस आदि सहीत मानवधिकार माहितीअधिकार व पोलीस मित्र संघटनेच्या महिला रुप्मा शहा ग्रा.प सदस्या आशा उपाध्यय दुर्गा दहाके वनिता शहा खुशी माडवगडे सविता मॅडम घोट आदिनी महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून भाऊबंधकीचे नाते दृढ करून आपुलकीचा संदेश दिला.

















