✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
आलापल्ली:-राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका त्रिरत्न बौद्ध विहार येथे. आर जे पी ए या अभ्यासिकेतून आधी सुद्धा बरेच मुलांनी सरकारी नोकरी मिळवलेली आहे. परंतु आत्ता झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सात मुलांनी सरकारी नोकरी पट कावली. त्यामुळे या सात विद्यार्थांचा सत्कार त्रिरत्न बौद्ध विहार ब्रम्हपुरी येथे . इ .एल रामटेके सर. जांभुळकर सर. गणवीर सर. रामटेकेसर व अल्लापल्ली च्या सुशीला भगत समाजसेविका तथा सेवानिवृत्त अंगणवाडी सुपरवायझर. पाटील मॅडम. रामटेके मॅडम. मेश्राम मॅडम शिक्षिका व इतर उपासिका तसेच शिक्षिकाच्या उपस्थितीत सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

यात विजया गोपाले कुलदिप बनकर पदविधर शिक्षक म्हणून नियुक्ती विपुल खोब्रागडे अस्मित मेश्राम समृद्धि रामटेके सहा. शिक्षक नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
अभ्यासिका मधले बरेचसे विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते. यांना भारताचे संविधान ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आलापलीच्या सुपरवायझर तथा नेपाळच्या पुरस्कार कर्त्या या गेल्या अनेक वर्षापासून शाळा कॉलेजेस दवाखाने व स्पर्धा मुलांना संविधान देऊन शाल श्रीफळ देऊन सन्मानित करतात. अशाप्रकारे हा कालचा त्रिरत्न बुद्ध विहारांमध्ये सत्कार सोहळा संपन्न झाला.















