✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
देसाईगंज:-देसाईगंज पोलिस स्टेशन हद्दीतिल तब्बल १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त झालेला १०९१३९० रुपयाचा दारुसाठा राज्य उत्पादन शुल्क विभाजे अधिकारी तसेच देसाईगंज पोलिस अधिकारी यांचे उपस्थितित नष्ट करण्यात आला.
देसाईगंज पोलीस स्टेशन च्या हद्दीत सन २०२५-२६ या कालावधीत पोलिस प्रशासनाने धाडी टाकून १८५ गुन्ह्याच्या नोंदितुन १०९१३९० रुपयाचा दारु साठा जप्त केला यात ९० मिली मापाच्या १२५२६ टिल्लु देशी दारु १८० मिली मापाच्या १३३ नग ७५० मिली च्या २ नग ५०० मिली च्या १७ बियर संञा कंपनी च्या ५३३ नग देशी दारु असा एकुण १०९१३९० रुपयाचा हस्तगत केलेला दारु साठा आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरिक्षक एम एम परांडकर सहा पो नि मनिष गोडबोले उपनि दुर्योधन सरपे मिनाक्षी तोडासे निलेश कढव सुनिल मडावी शैलेश तोरपकवार पोरकर यांचे उपस्थितित नष्ट करण्यात आला. सदरची कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी मडामे यांचे आदेशानुसार पोलिस निरिक्षक स्वप्निल इजपवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.















