✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-पोर्ला येथील शेतकरी भाऊराव भगवान म्हशाखेत्री यांचेवर वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केले असून त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला गावातील शेतकरी भाऊराव भगवान म्हशाखेत्री पोर्ला वय ४५ वर्ष दि. १३ संष्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पोटेश्वर मार्गावरील शेतात खत टाकण्याकरीता गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने भाऊराव यांचेवर झडप घालून त्यांना हातापायाला गंभीर जखमी केले भाऊरावने आरडाओरड करताच वाघ निघुन गेला.

सदर बातमी पोर्ला गावात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे गावकरी व वनविभाग पोर्लाचे वॉचर घटनास्थळ गाठून भाऊराव यांना पोर्ला येथील दवाखाण्यात भरती केल्यानंतर त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आलेले आहे. संध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. वनविभाग पोर्लाचे RFo पाचभाई व तेथील कर्मचार्यांनी वाघाचा बंदोबस्त करावा अशी पोर्ला वासियांची मागणी आहे.













