१६ सप्टेंबरला चंद्रपुर दिक्षाभुमी मुक्ती आंदोलन- भव्य आक्रोश मोर्चा निघणार:-ऍण्ड प्रियंका चव्हाण गडचिरोलीच्या कार्यकर्त्यां सोबत चर्चा
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-दिक्षाभुमी चंद्रपूर चा वाद दिवशेन दिवश पेटत चालला असून घरानेशाही संपृष्ठात आणून दिक्षाभुमीची समिती सर्व समावेसक करावी किंवा समता सैनिक दलाच्या स्वाधीन करावी यासाठी येत्या १६ संप्टेंबर २०२६ ला चंद्रपूर दीक्षाभुमी मुक्ती आंदोलन भव्य आक्रोश मोर्चात सर्व संघानेच्या लोकांनी सामील व्हावे असे आवाहन ॲड. प्रियंका चव्हाण यांनी गडचिरोली येथील पार पडलेल्या बौद्ध बांधवाच्या बैठकीत केले.अँड. प्रियका चव्हाण यांनी पुढे सांगीतले

सांगीतले की 💢चंद्रपूर – गडचिरोलीची युवा पिढी घोटेकरांच्या विरोधात नाही किंवा खोब्रागडे घराण्याच्या बाजूनेही आम्ही लढत नाही. मी राजकारणीही नाही व मी समितीत राहणारही नाही परंतु १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने निर्माण झालेली चंद्रपूरची दिक्षाभुमी हि एक मोठ बौद्ध विहार व्हाव परंतु बाबासाहेबाचे स्वप्न अधुरेच राहीले या दिक्षाभुमीचा विकास व्हावा परंतु या दिक्षाभुमीचा आजतागयत विकास झालेला नाही. याच कारण म्हणजे घोटेकरांची घराणेशाही , १६ ऑक्टोबर च्या कार्यक्रमात राजकारणी लोकांना बोलवून कार्यक्रम घेतले जातात.
*मोर्च्यातील *मागण्या*
( । ) समितीत एकाच सदस्य नसावेत समाजातील सुशिक्षित जाणकार व्यक्तीचा सहभाग असावा
(2) १६ ऑक्टोबरचा कार्यक्रम समाजाच्या वतीने घेण्यात यावा
(3) दिक्षाभुमीचे बांधकाम पूर्ण करावेत
(४) कार्यक्रमाच्या दिवशी दिक्षाभुमी परिसरात स्टॉल लावण्यात येऊ नये
( ५ ) दिक्षाभूमी परिसरात राजकिय कार्यक्रम घेण्यात येऊ नये
( ६ ) दिक्षाभुमीची समिती जनतेसमोर जाहीर करावी , तज्ञ संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे.
( ७ ) जिल्हाधिकारी चंद्रपूर , शासनाच्या माध्यमातून समिती गठीत करावी.अश्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या असुन आम्ही चुकीचा आरोप करीत असलो तर जनतेसमोर समिती ( कार्यकारणी ) नी सांगावे.होवू घातलेला मोर्चाकडे केवळ आंदोलन म्हणून नव्हे तर पवित्र दिक्षाभुमीच्या संरक्षणासाठी सामुहिक जबाबदारी म्हणून पहावे व लढ्यात मोठया संख्येनी सामिल व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या एड. प्रियंका चव्हाण यांनी गडचिरोली येथील पार पडलेल्या बौद्ध बांधवांच्या बैठकीत केले.सदर बैठकीला सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर ॲड. विनय बांबोळे गोपाल रायपुरे भोजराज कान्हेकर दशरथ साखरे मारोती भैसारे प्रमोद राऊत लहुकुंश भैसारे जैराम उंदिरवाडे रोशन उके जिवन मेश्राम प्रेमदास रामटेके डोमाजी गेडाम दामोधर शेन्डे हेमंत बारसागडे राजु वनकर मोरेश्वर निमगडे नेताजी मेश्राम राहुल घोनमोडे नरेंद्र शेंन्डे सुरेश मेश्राम अविनाश चुनारकर अतिश मेश्राम प्रेमलता कान्हेकर लता रामटेके विशाखा देवतळे प्रियंका दुपारेआदिसहीत बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते. सदर मोर्च्याला गडचिरोलीतून दोनसे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले.














