✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-प्राथमिक उपकेंद्र क्षेत्रांतर्गत नियमित लसीकरण सत्रानंतर घडलेल्या एका बालकाच्या दुर्दैवी मृत्यूच्या (AEFI – Adverse Event Following Immunization) घटनेबद्दल प्राथमिक खुलासा.
प्राथमिक माहितीनुसार, मौजे कवराम तालुका अहेरी येथील श्रीमती सुनिता शामराव तलांडी यांच्या दोन महिन्यांच्या बालकाला नियमानुसार लसीचे डोस देण्यात आले होते. त्यानंतर बालकाची प्रकृती खालावून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, घटनेमागील नेमके वैद्यकीय कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची जिल्हास्तरीय चौकशी समिती (AEFI Committee) गठीत करण्यात आली आहे.
- चौकशी समितीची कार्यवाही समिती घटनास्थळी भेट देऊन लसीची साठवणूक (Cold Chain), संबंधित बॅच, लसीकरणाची प्रक्रिया आणि बालकाची वैद्यकीय पार्श्वभूमी याबाबत सखोल तपास करत आहे.
- वैद्यकीय अहवाल बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन (Post-Mortem) व समितीच्या अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होईल.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये; चौकशीचा अहवाल प्राप्त होताच वस्तुस्थिती समोर येईल,
असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी केले आहे.














