✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे द्वारे बार्टीच्या विविध योजना संबंधाने बार्टी चे वृदय गोडबोले यांच्या मार्गदर्शना खाली समाज कल्याण विभाग गडचिरोली च्या हालमधे बैठक संपन्न झाली. यात MCEB चे अधिकारी ताकडे समन्वयक वंदना धोंगडे वडसा आदिचे मार्गदर्शन लाभले.
यांप्रसंगी वृदय गोडबोले बार्टी यांनी सांगीतले की बिगरशेती भुमीहिनांना शेती मिळवून देणे , कुकडपालन गोटफार्म व्यवसाय करणाऱ्यांना ७५ % सुटीवर कर्ज देणे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना शिक्षवृत्ती मिळवून देणे शिक्षण घेणाऱ्या अनु. जातीच्या मुलांना वस्तीगृहात प्रवेश देणे सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना उध्योगाकडे वळवणे आदि विविध प्रकारच्या योजनासाठी बार्टी सहकार्य करीत असते त्यामुळे बेरोजगारांनी व्यवसायाकडे वळावे असे आवाहनही गोडबोले यांनी केले.
सदर बैठकीला सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे प्रा. मुनिश्वर बोरकर गायक कलाकार महेंद्र ठाकरे दशरथ साखरे शरद लोणारे बंडू वाकडे संजय वाळके जमनादास मेश्राम हळदवाई हेंमत मेश्राम आदिची उपस्थिती होती.












