पदवीधर मतदार नोंदणी व SIR संदर्भात चिमूर-ब्रह्मपुरी मतदार संघात काँग्रेसची आढावा बैठक
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार नोंदणी तसेच SIR (Special Intensive Revision) संदर्भात चिमूर आणि ब्रह्मपुरी येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र विधानसभेचे कॉंग्रेस गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीत नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पात्र पदवीधर मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या तसेच SIR प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रत्येक पात्र सुशिक्षित पदवीधराचे नाव मतदार यादीत समाविष्ट झाले पाहिजे


, यासाठी गावोगावी तसेच शहरातील प्रत्येक भागात प्रत्यक्ष संपर्क साधून पदवीधर मतदार नोंदणीची मोहीम अधिक गतिमान करावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. नोंदणी प्रक्रियेत कोणताही पात्र पदवीधर वंचित राहू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. पदवीधरांच्या हक्कांचे प्रश्न, रोजगार, शिक्षण, कौशल्यविकास आणि त्यांच्या भविष्यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी ब्रम्हपुरी बी एल ए-१ तथा ब्रम्हपुरी ब्लॉक अध्यक्ष खेमराज तिडके, चिमूर बी एल ए-१ विजयकुमार घरत चिमूर ब्लॉक अध्यक्ष विजय गावंडे, नागभीड ब्लॉक अध्यक्ष प्रमोद चौधरी, सिंदेवाही ब्लॉक अध्यक्ष रमाकांत लोंधे, सावली ब्लॉक अध्यक्ष नितीन गोहणे, डॉ. कायलकर, श्रीराम राऊत, ओबीसी काँग्रेसचे धनराज मुंगले, विवेक कापसे, अरुण कुमार, बापूजी टिपले, घनश्याम चापले, राजू कापसे, मानसिंग रतन सिंग, मनोज दिघोरी, रामदास चौधरी, सचिन गाडीदार, बाबू खान, योगेश दडमळ, नागेंद्र चट्टे, गणेश कारेकर, श्रीकांत गेडाम, विनोद बोरकर, प्रणया गडमवार, योगेश निसार, जुनेर खान, नेताजी मेश्राम, प्रमोद चौधरी, सुरज चौधरी , प्रा. राजेश कांबळे, विजय तुमाने, प्रमोद चिमूरकर, गफार पटेल, दादाजी चौके, राममोहन ब्रादिया, हितेंद्र राऊत, प्रभाकर शेलेकर, सीमा विनोद सहारे, विनिम्रता कोकोडे, प्रीती सागरे, मीनाक्षी मेश्राम, वैशाली वडेट्टीवार, राहुल पोरेड्डीवार, सुनील उदलवार, रमाकांत श्रीधरे, गणेश मेश्राम, अमित भागवणे, हिमांशू नांदुरकर, अतुल राऊत, सुधांशु आलोटे, मंगेश मेश्राम, सुनील पेंदाम, सचिन नामांडवर, राहुल बोडगे, जगदीश पिल्लारे, अजय मुरकुटे, पुष्पाकर बांगरे, सचिन सदारे यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.















