✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
चामोर्शी:-चामोर्शी तालुक्यातील घोट शर्कल मधील मक्केपल्ली चक १ जवळील गोलबंदरी येथील सुभाष विजय मेश्राम वय ३२ वर्ष यांचा मन्यार साप चावल्याने मृत्यु झाला.
रात्रौ १२ च्या दरम्यान सुभाष झोपेत असतांना घराच्या वरून मन्यार साप सुभाषच्या अंगावर पडताच त्याने हालचाल केली असता सापाने सुभाषला चावा घेतला. घरचे लोक जागा झाले तेव्हा मन्यार सापाला बाथरूम मधुन पकडून ठेवला व घरच्या मंडळीनी लगेच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे भरती करण्यात आले शेवटी त्याला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले परंतु त्याला गाठी आल्यामुळे चार तासातच त्याचा मृत्यु झाला त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत त्यांच्या मृत्युमुळे गावात हळहळ करण्यात आली.













