प्रशासनाने सफाई कामगारांकडे लक्ष घ्यावे.पत्रकार परिषदेत शेरसिंग डागो यांची माहिती
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-नागरिकांच्या आरोग्यांची रक्षा सफाई कामगार करतो परंतु सफाई कामगारांची रक्षा कोण करणार शासनाने सफाई कामगारांच्या समश्याकडे लक्ष घ्यावे त्यांचा पगार वाढवावा अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सुव्कानसिंग डागो यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधतांना माहीती दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी अविशांत पड्या सचिव अनिरुद्ध पालकर अर्चना मेंढे मॅडम अखिल भारतीय सफाई मजदुर संघटनेचे योगेश सोनवणे आदिंची उपस्थिती होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाध्याय योजना शासनाने सुरु केली असून यांचा लाभ सफाई कामगारांनी घ्यावा. सफाई कामगारांचा पगार वाढविण्यात यावा , ठेकेदारी पद्धत बंद करून सफाई कामगारांना सेवेत घ्यावे सफाई कामगारांच्या मोठ्या बिमारित शासनाने ५ लाखांचे सहकार्य करावे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करावे समाज कल्याणच्या विविध योजना सफाई कामगारांना दिल्या पाहिजेत स्वयरोजगारांना साठी सहकार्य करावे तरच सफाई कामगारांचा व त्यांच्या मुलांचा विकास साधता येइल अशीही माहिती राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागो यांनी पत्रकार परिषदेत दिली.













