✍️ दिनेश झाडे
मुख्य म्हणजे
कोरपना:-उज्जैन येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कोरपन्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल सहा पदकांची कमाई केली. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य सिद्ध केल्याने कोरपना परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. स्पर्धेत प्रेम मुरलीधर सलाम आणि प्रतीक बालाजी नरवटे यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तर सिद्धांत प्रवीण पेटकर, ओम कृष्णा गोसे आणि नैनीषा नागार्जुन कोमेनेनी यांनी रौप्यपदक मिळवले. खेळाडूंनी विविध गटांत प्रतिस्पर्ध्यांना चांगली झुंज देत पदकांवर आपली मोहर उमटवली. या खेळाडूंना योद्धा मार्शल आर्ट व क्रीडा क्लबचे मुख्य प्रशिक्षक सूरज खोबरकर यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर खेळाडूंनी हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे पालक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत













