✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
सावली:- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ.बंटी भांगडीया यांनी गडचिरोली दौऱ्यावर असतांना व्याहाड खुर्द येथील निखिल सुरमवार,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे राहते घरी भेट दिली.त्यामुळे जनमानसात एकच चर्चा रंगू लागली.की निखिल सुरमवार भाजपात पक्ष प्रवेश करणार काय? या चर्चेला उधाण येताच जनतेत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चेच खंडन केले.आ.विजय वडेट्टीवार हाच माझा पक्ष,मी कांग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. पूर्वीही होतो आणी आताही राहीन. अशी ग्वाही पत्रकार परिषदेतुन केली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित निखिल सुरमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,साधना वाढई नगराध्यक्ष,नितीन गोहणे तालुका कांग्रेस अध्यक्ष,उषा भोयर तालुका महिला कांग्रेस अध्यक्षा,कृष्ण राऊत युवा शहर अध्यक्ष,विजय कोरेवार माजी सभापती, केशव भरडकर माजी ग्रा.प.सदस्य आदी बांधव उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना निखिल सुरमवार म्हणाले की आ.बंटी भांगडीया यांची कौटुंबिक भेट होती.औपचारिता म्हणून माझा घरी आले होते. माझा कुटूंबाशी फार वर्षापासून घट्ट नातेसंबंध आहेत.परंतु ती कोणतीही राजकीय भेट नव्हती.इतर कोणत्याही राजकीय पक्षांनी यांचा बाहू करून घेऊ नये.मी आ.विजय वडेट्टीवार यांचा व कांग्रेस या राजकिय पक्षाचा कार्यकर्ता आहे.आणि पुढेही राहीन.यात अजीबात कोणतीही शंका नाही.त्यामुळे माझ्या विरोधी पक्षांनी माझी नाहक बदनामी करू नये.अशी ग्वाही या पत्रकार परिषदेतुन देत आहे.













