✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
नागपूर:-नागपूर विधानसभा विस्तारीकरणासाठी संविधान चौक परिसरातील त्रिकोणी जागेचा वापर करण्याबाबत नागपूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहराच्या वतीने लेखी हरकत नोंदविण्यात आली.
संविधान चौक हे सामाजिक व लोकशाही आंदोलनांचे महत्त्वाचे केंद्र असून, त्रिकोणी पार्कच्या बाजूची जागा आंदोलक व नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ही जागा कमी न करता विद्यमान मार्ग व परिसर पूर्ववत कायम ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रकाश कुंभे | क्षितिज गायकवाड | रजत महेशगवळी नानाजी ढेंगरे , डॉ चरणजीत जनबंधू,अश्वजीत गायकवाड,सुरेश खोब्रागडे धम्मरक्षित मेश्राम, छत्रपाल टेंभुर्णे,श्यामराव हाडके,राजेश ढेंगरे,मुकुंद मेंढे यांच्यासह RPI नागपूर शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहर
शिका | संघटित व्हा | संघर्ष करा












