✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-पोलीस स्टेशन कोरपना येथे दाखल असलेल्या अप. क्रमांक 344/2026 मधील चोरीस गेलेली पल्सर NS 160 मोटारसायकल क्रमांक MH 34 BJ 4733 ही आरोपी नामे 1) महेश सुरेश पोतुकलवार व 2) आशिष उर्फ ऋतिक जानकीराम चौधरी यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.सदर मोटारसायकल दिनांक 30/10/2026 रोजी परसोडा फाटा येथून पोलीस पथकाने हस्तगत केली.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपानी साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे साहेब, मा.
उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर श्री. रवींद्र जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री. विनोद रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली 1)पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव साहेब 2)पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वाकूलकर बक्कल क्रमांक 969, 3)पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव पवार, बक्कल क्रमांक 1226 ,4) पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राजुरकर बक्कल क्रमांक 166 यांनी केली.
पोलीस स्टेशन कोरपना
जिल्हा चंद्रपूर















