संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅट ईव्हीएम मशीनला जोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले . नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅट न लावल्याने मतांची चोरी करण्यात आली . त्यामुळे मतदारांना आपला योग्य उमेदवार निवडता आला नाही .
यापुढे होणाऱ्या ४२ नगरपंचायत , २९ महानगरपालीका ३४ जिल्हापरिषद यांच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅट जोडण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रभर रॅली प्रदर्शन , जेलभरो आंदोलन करून 2२ फेब्रुवारीला नागपूरच्या आरएसएस मुख्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येईल असा ईशारा भारत मुक्ती मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा , राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा , बहुजन मुक्ती पार्टी व विविध संघटनांनी दिला .
निवेदन देतेवेळी गडचिरोली लोकसभा अध्यक्ष चंद्रमणी शेंभरकर , भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , प्रमोद राऊत संयोजक राष्ट्रीय किसान मोर्चा , डोमाजी गेडाम बहुजन मुक्ती पार्टी , मोरेश्वर निमगडे सेवानिवृत एएसआय , वासुदेव कृष्णाके व देवानंद खुणे उपस्थित होते .









